आज दिनांक : 20-10-2014

बातम्या :
पंचायत समिती हवेली,आपले सहर्ष स्वागत करत आहे.

हवेली पंचायत समितीच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

पंचायत समित्यांची रचना

प्रत्येक पंचायत समितीमध्ये कलम ५८ आणि त्या बाबतचे नियम यांत अंतर्भूत असलेल्या तरतूदींनुसार प्रत्येक निर्वाचक गुणामधून प्रत्येक एक याप्रमाणे प्रत्यक्ष निवडनिणुकीद्वारे निवडलेल्या सदस्यांचा समावेश असेल परंतू पंचायत समीतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि अशा पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांची संख्या यामधील गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर संपुर्ण राज्यामध्ये सारखेच असेल. आणखी वाचा

पंचायती राज

भारतातील ग्रामीण भागातील स्थानिक संस्थांचे वर्णन पंचायती राज असे केले जाते. ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिंषद हे पंचायती राज व्यवस्थेचे घटक आहेत. भारतातील बहुसंख्य लोक खेडयांमध्ये राहतात आणि त्यांना त्यांच्यावर परिणाम करणार्‍या निर्णयांमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असते. भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि ग्रामीण भागातील जनतेची उन्नती झाल्याशिवाय देशाला प्रगती करता येणार नाही.